Thursday 6 July 2017

पाऊस आणि आठवण

टपटपणाऱ्या आवाजावर
आठवणी पुन्हा बहरतात
वय विसरायला लावून
पुन्हा वेडं बनवतात

पावसाची ती जोराची सर
एकटी कधीच येत नाही
ओंजळभर आठवणी
सांडल्या शिवाय जात नाही


आठवणी कधीकधी
पावसा सारख्या वागतात
जाता जाता मनामधे
हलका ओलावा सोडून जातात

बऱ्याचदा याच आठवणी
मुसळधार बरसतात
ओक्साबोक्षी आक्रंदिले तरी
नुसतीच डबकी साचतात

वाट तुझी पाहताना
हमखास तो आधी येतो
आठवणींच्या झोक्यावर
तुला संगे घेऊन येतो

आजही खिडकीतून बाहेर
एकटक पहावसं वाटतं
तू नसलीस तरी
पावसाला निरखावसं वाटतं

पावसाची वाट पाहताना
नेत्र नभाकडे लागतात
तुझी वाट पाहताना
आठवणी दाटून येतात

आठवणींची एक गंमत असते
हृदय आधी नेत्र नंतर ओले होतात
पावसातल्या आठवणींमधे
अासवं पावसात वाहून जातात

आठवणीतली जळमटं
पावसानं धुता येत नाहीत
पावसाच्या आठवणी
विसरून विसरता येत नाहीत

~संदीप कुलकर्णी

No comments:

Post a Comment

Name:
Message: